Saturday, February 26, 2011

few here n there.. -2

सुटका हि सरणावरच होते,

स्वतःसाठी तरी..

बाकी लोकांना ताटकळत ठेऊन ,

परत दुसरी काहीतरी सोय करायला..





का विस्कटली आयुष्याची घडी मी,

ती कागदी नाव त्या संथ पाण्यात किती बेसावध होती..

का म्हणून अचानक वादळ यावे अन अस्तित्व मिटाव त्या नावेच..

गुणगुणायला सूरच गवसावा..

नभाला धरतीशी मिळायला क्षितिजही पारखा व्हावा..

त्या घडीखाली कमीत कमी धूसर आशेचं आवरण होतं..

तू नसणार हे जाणून मी..

पण नाही सहन होत, दुसरा कुणीतरी होईल किनारा माझा..

हि कल्पना, हे जीवघेणं सत्य..

आता श्वासही दाटतो छातीत माझ्या..






जरासं लक्ष दिलं असतंस..

कदाचित, त्या हुंद्क्यातले सूर ऐकले असते..

ते ऐकता ऐकता शेर हि अर्ज केला असता..

ते आभाळ मन भरून रडलं तरी असतं रे..

प्रेम नाही तर नाही,

मन मोकळं करू दिलं असतंस,

जरासं लक्ष दिलं असतंस..






त्या प्रश्नचिन्हांना कधी उत्तरून बघितलं असतं..

मग कळली असती व्यथा माझी..

किती जीवघेणा प्रहार असतो त्यांचा..

खरं तर उत्तर माहित असतात मला..

त्या उत्तरांचा विचारही काळीज चिरून टाकतो माझा..

अन तू रमलेला तिथे..

त्या उत्तरांशी खेळ मांडत माझा!!






परत एक कळ उठली काळजात तुझं नाव बघून!!

पुन्हा त्याच त्या जुन्या आठवणी नव्याने अंग मोडून पडल्या..

विषन्नतेने बघत माझ्याकडे..

पुन्हा निर्विकार जाहल्या !!






आठवण तुझी.. कशी तीक्ष्ण येते..

रेघोट्या उमटवून जाते मनावर माझ्या..

एक अनावर हुरहूर देऊन जाते!!

ते माझ्यासाठी झुरणं तुझं,

पुन्हा पुन्हा मागे वळून बघणं तुझं..

उगीच प्रेमात पाडलं मला,

असहाय्यपणे बघत सोडून जायला!!

रोज नवी पालवी फुटते मनाला माझ्या..

अन आठवणींचे काटे रुततात देहास माझ्या!!






आत्मसात करायचा धैर्य खचल रे सगळं..

दुर्लक्ष करणं तर शक्यच नाही..

दर क्षणाला अजूनच घट्ट होत जाणारी गाठ तुझ्या आठवणींची..

हातात गुरफटलेले हाथ अन तसेच मन..

किंवा देह ही..

भानावर येत येत..

सगळंच खिन्न अन असहाय्य झालेलं!!






याद आया मुझे, तुम्हारा वो मेरी अनकही बातें सुनलेना..

और मुहोब्बत की वो चोट आज फिर उभर आयी!!





दिलेला प्रत्येक स्पर्श तूझा,

मनावर खरबडीत उमटला..

असाच हर क्षण, अनुभवायचा राहून गेला...







अन त्या बिछान्यावर अस्त्याव्यस्त पडलेलं मन माझं..

थोडसं कुरवाळलेलं अन जास्तीच ओरबाडलेल ..

परत गुंतायला आसुसलेलं, सगळीच बंधनं तोडलेलं

गुणाकाराच उत्तर तुझ्याकडून शून्यच येणार हे माहित असलेलं

अन तरीही त्या शुभ्र संकेतावर कुंकवाची लाली पसरवलेला ..

पुन्हा बिछान्यावर अस्त्याव्यस्त पडलेलं

तू नसताना...

तू नसताना

तुझ्यासोबत बोलणे ..

कल्पनेत तुलाच बघणे ..

आठवणीत तुझ्या निजणे ..

प्रत्येक ओळीत नाव तुझंच असणे ..

तू नकळत सामावतोस माझ्यात ..

आता डोळ्यात पाणी नेहमीच खळलेलं ..

रस्ता हा असा कधीच खुंटलेला..

मन नेहमीच वेडावलेले, अशांत..

तुझ्याच अधीन असलेलं...

तू नसताना

मग होते..

अंधकारात शुभ्र सहवासाची अपेक्षा ...

नदीकिनारी पाण्यात तुझेच प्रतिबिंब शोधत..

मग माझे मलाच मिठीत घेणे त्या निशब्द पाऊलवाटेवर ..

तू नसताना

चिंब चिंब भिजणे त्या आठवणीत तुझ्या ..

त्या आठवणीत तुझ्या भेटीचे सौख्य मिळवणे..

अन घडी घडी स्वतःलाच खुलासा कर राहणे माझे...

तू नसताना

आता

जगणे अधुरे वाटते ..

ती झुळूक लाजायचंच विसरते ..

नवीन तार छेडायच्या आशेत, माझा मनच जुनं होते ..

तू नसताना

तुला अनुभवते आता कधीकृष्णाच्यानावात..

अन हसूही आता थिजलेसे..

किणाऱ्यावर असते मी भिजलेली अन विस्कटलेली..

असंच झालाय आता

तू नसताना...

--वैशाली