Sunday, June 3, 2012

भास तुझा..

अलगद संध्याकाळ उतरता..  भास तुझा होत असे मला,
तो मंद कुंद वर माझ्याच मिठीत सामाऊन घेत असे मला,
तो ओला श्वास छळत असे मला..
चांदणे नेसून आभाळ, आस लावत असे मला !!

ती बेधुंद रात्र, पुढे सरकायचा विसरते आता,
तो सुगंधी प्राजक्त, अंगातून व्हायचं राहतो आता.
रोज हि शिक्षा भोगून थकते मी आता..
तो चंद्र हि तमाशा बघतो रोजच आता !!

भास तुझ्या उमटलेल्या पावलांचा,
भास तुझ्या सांडलेल्या श्वासांचा,
भास माझ्या व्याकुळ अधीर उत्सुकतेचा..
तर भास कधी त्या बेखबर हालचालींचा !!

हा आभास रोजचाच झाला आता..
श्वासांचा कपूर देहांत जळतो जसा !!