Tuesday, May 29, 2012

काय चुकतंय ?

हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी  काढून टाकावी ह्या मनावरून.. 
तसंच हे आयुष्य!!  ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ??

आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला..

आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय.. कळत नाहीये पण काहीतरी वेगळं चाललंय..
मी जे आता दुखाचे हुंकार गातेय ते चुकीचे कि कधी सुखात चिंब भिजायचे ते चुकत होतं..
हि आजची मानसिक कुरूपता चुकीची कि कधी वाटून गेलेली सुंदरता...
चुकीचा तो ओला श्वास कि तो ओला गंध मदिर?
ते जत्रेत हरवलेला पोर चुकलं होतं कि दोष त्या सुसाट वाऱ्याचा होता ..
मी आज फुकट बसलेय ते चुकतंय कि ह्याआधी १२-१२ तास काम करायचे ते चुकत होतं..
आज उगीच कुणावर जीव भाळावं वाटलं हे चुकलं,  कि  आधी झालेला प्रेमभंग चुकिचा?
त्या अथक प्रयत्नांना आलेला अपयश चुकीचं कि ते प्रयत्नच चुकीचे !

कालचा दिवस जाता जाता मला हूर हूर लावून गेला .. रखरखीत वाटला होतं..
आज तोच मला सुंदर वाटतोय!! 
मग चुकतंय कुठे ??
नक्की चुकतं आहे ना ???

No comments:

Post a Comment