नकार तू काय दिलास, जगण्याची व्याख्याच बदलली..
आता पहाटेची आस, न रात्रीची ओढ राहिली !!
षड्जावर सोडलस मला, कळत नाही सुरवात की अंत हा..
न्हायचे होते दवात, की रात्र संपल्याच्या इशारा
परतवल्या तू शपथा, ऐन सांजेस घेतलेल्या..
अंतरीच्या जखमा, त्या हुंदक्यातच दाटल्या !!
माझ्या खुल्या किताबात, वाचला खोडलेला शब्द तू नेमका..
विझले पापणीतले स्वप्न, अन तो विरघळता इशारा!!
कूस बदलूनही, काही साध्य होत नाही आता..
अर्धा बिछाना, आजकाल रिकामाच
--वैशाली
No comments:
Post a Comment