दिवस लोटले, कितीतरी वर्ष लोटले..
किमान 3-4 तरी..
पण अजूनही तुझ्या स्मृती शून्यात मला नेतात..
आता हि तुझं नाव online लिस्ट मध्ये बघता..
आपसूकच उत्साह संचारतो माझ्यात..
डोळ्यात एक अलगच चमक येते..
रात्रीत काजवा चमकावा जसा..
नव्यानेच उमलते मी परत, तुझ्यात गुरफटायला..
तुला खरं नाही वाटणार,
पण मनाला कसलं relief वाटतं सांगू..
तसाच वेळ जातो..
तू आता बोलशील..
तेव्हा बोलशील..
असाच वेळ निसटत जातो..
अन ती कोरी पाटी पुसून, तू शिकवून मज जातोस..
माझा पण ego.. मी नाही बोलत..
खरं तर,
मला भीतीच जास्त असते..
तू reply करणार कि नाही..
जर केलाच, तर नेमके काय-काय आणि किती बोलायचे हेच उमगले नसते..
जर तू reply नसता केला.. तर मला अजून वाईट वाटले असते..
वेड्यागत स्तिथी झाली असती माझी..
मग सगळे नको ते विचार येतात मनात..
तेव्हा माझा स्पर्श करपवून, उमलून तू गेलास..
असेच भानावर परतता..
तू केव्हाच offline झालेला असतो..
असा बेरंग मज करून, रंगून तू गेलेला असतोस..
मग परत माझी शोधा-शोध..
कधीच न परत दिसणाऱ्या तुझ्यासाठी..
मग बोचते ते शल्य माझे पुन्हा मजला..
तू गेलास न परतण्यासाठी तेव्हा !!..
--वैशाली
No comments:
Post a Comment