काय चुकले, कुठे चुकले, समझेनासं झालंय ..
नेमकं कोण चुकलं?
त्याचा अट्टाहास कि माझी सहनशीलता ..
कि बघणाऱ्यांची असहायता ?
कधी असते गुलाबी थंडी, तर कधी गर्द अंधार..
कधी पावसाची रिमझिम, तर कधी भयाण शांतता..
स्वतःला झोकावं तरी कुणीकडे..
काहीही निवडलं तरी येते ती मूर्त होणारी बंधने, नाती -गोती आणि एकटीच उरलेली मी ..
मला मुक्त व्हायचं असतं कि सगळ्यांना मला नैराश्येच्या गर्तेत सोडायचं असतं ?
लोकं खरं म्हणतात, खऱ्या मित्राची परीक्षा संकट वेळी होते ..
मी कधी कुणाचं खूप चांगलं केलं नसेल, पण वाईट तर नक्कीच कुणाचं कधी नाही केलं ..
पण.. माझं वाईट करायला कशी सहज पुढे सरसावते.. मैत्रीण म्हणे ..
आणि मी वेडी.. माझ्यावर ओढलेलं संकट निस्तरायचं सोडून, तिने असं का केलं.. हेच मला नैराश्यात पावलो पावली खेचते ..
सगळंच कसं विस्कटलय.. रूप माझं मावळलय..
जळमट झालीये मनात आणि लिहिणं नेमकं मी विसरलेय कि टुकार झालंय ह्याचा शोध लागेनासा झालाय..
दगा विसरायचा कि संकट निस्तरायचं...
संकट पण कसं, आपल्याच माणसाने सहजगत्या दिलेलं ..
कुठे मी लग्नाची स्वप्न रंगवत होते ...
लग्ना नंतरचे नवीन दिवस ते ..
ती गुलाबी थंडी.. तो नवीनच अनुभवलेला अंगाचा गंध ..
ती आत्कटता, नवीनच उमजलेला त्याचा स्पर्शाचं आकर्षण माझ्या शरीराला ..
ते चोरी -छुपे एकमेकांना पाहणे, ती अनाम ओढ ..
ते नजरेचे एक होणे, न सांगता शरीराचे हि ..
अन तो फुलांचा सडा घरभर ..
स्वप्न आकार घेत होतं..
मधेच नजरेला काही खुपायचं.. सोडून देणं, माफ करण .. स्वभावातच होतं कि ..
पुन्हा शरीर एक व्हायचे मन एक होण्या अगोदर ..
पुन्हा कळ्यांचा सडा घरभर ..
आता जरा जास्तच खटकायला लागलं होतं ..
शब्द अन नजरेचा मेल काही बसत नव्हता ..,
पुन्हा ती रात्र.. तो एकच बिछाना ..
पुन्हा एक व्हायचे, ह्यावेळी, शरीर नकार पुकारत असताना ..
कळलंच नाही कधी त्याची ओढ माझी अगतीगता बनली ..
पुन्हा अतृप्त आसवांचा सडा घरभर ..
मग, डोळ्यांत दुखतं उगीचच..
स्वप्नांना एकदाचा नावडता शेवट लाभतो ..
सोडणं आलाच स्वभावानुसार..
मग का नाही सोडायचं त्यालाही.. का नाही सोडवायचं स्वतःलाही ..
चूक असुदेत कुणाचीहि .. भोगावं तर मलाच लागतंय ..
अतृप्त असं सगळं काही.. सैरभैर करणारं.. मुक्त व्हावसं वाटणारं..
कि पुन्हा तीच अनाम ओढ जागृत करणारं ?? खरंच मुक्त करणारं कि मला पुन्हा एक अतृप्त आत्मा करणारं..
यंदा कोण चुकतंय ??

No comments:
Post a Comment