Thursday, December 2, 2010

तुम्हारे जाने के बाद..

बंदिशोसे सूर बेह्गये, तुम्हारे जाने के बाद..

हम कुछ इस तरह बरबाद हो हे है, तुम्हारे जाने के बाद..

तेरे कहने पर मुस्कुरा तो हम दिये..

फिजायें अनसुनिसी हर बात कर रही है, तुम्हारे जाने के बाद..

बेखबर वो फकीर, प्यार की दुहाई दे गया..

मुहोब्बत के मारे हम बन रहे है, तुम्हारे जाने के बाद..

अंदाज--बयाँ अब बेहकासा होगया,

हर बार फिरसे उलझ रहे है, तुम्हारे जाने के बाद..

मंजिल मेरी तेरे गम के अंधेरोमे दफ्न होगयी,

दर्द के सैलाब से हम लिपट रहे है, तुम्हारे जाने के बाद..

रूह की रुकसत से मौत नहीं आती..

सरे आम हम रुसवा हो रहे है, तुम्हारे जाने के बाद..

आज फिरसे दिल तुम्हे दुवा दे गया..

दिल में अब भी एक चुभन हो रही है, तुम्हारे जाने के बाद..

--वैशाली

नकार...

नकार तू काय दिलास, जगण्याची व्याख्याच बदलली..

आता पहाटेची आस, रात्रीची ओढ राहिली !!

षड्जावर सोडलस मला, कळत नाही सुरवात की अंत हा..

न्हायचे होते दवात, की रात्र संपल्याच्या इशारा हा !!

परतवल्या तू शपथा, ऐन सांजेस घेतलेल्या..

अंतरीच्या जखमा, त्या हुंदक्यातच दाटल्या !!

माझ्या खुल्या किताबात, वाचला खोडलेला शब्द तू नेमका..

विझले पापणीतले स्वप्न, अन तो विरघळता इशारा!!

कूस बदलूनही, काही साध्य होत नाही आता..

अर्धा बिछाना, आजकाल रिकामाच असतो म्हणा !!

--वैशाली

आठवण..

लपंडाव आठवणींचा,

सुरु झाला नकळत माझ्या मना..

साथ एक तुझीच मागितली होती,

अन तू राखल्या गाठी आठवणींच्या!!

उसवता उसवत नाही,

मनातून ती उतरत नाही..

याद करता तुला,

घट्ट होणं ती विसरत नाही..

देहाची उकलावी की मनातली..

भुसभुशीत होणार माती पायाखाली..

ओढून काळसर ती किनार,

का वादळासारखी पहाट ओघळली..

एकच किनारा माझ्या पातीस आला,

बहाणा तुझा कधी उमजला ..

गुंता झाला तेव्हा श्वासाचा माझ्या..

तरी आठवणींचा गुणाकार दर क्षणाला..

--वैशाली

Thursday, November 11, 2010

शिक्षा..

जगण्याची सत्यता समोर येता,

थेंब ही गळका झाला..

त्या ओल्या पावसात,

का तो मल्हार अजून कोरडा !!

नको तो रंग, तो आकार मला,

सगळेच अर्थहीन त्या भाबड्या जीवाला..

त्या गुंतागुंतीच्या नात्यात,

का शिक्षा पुनः पुनः मला !!

नका ओढू काचेच्या क्षणाला..

मन असते आंधळे कातरवेळेला.

त्या भग्न हृदयात,

का सदा अंधाऱ्या रात्रीची मळकटता !!

गोफ तुटला विकल मनाचा..

सुखदुखाच्या सावल्यांचे तुकडे जमवता..

त्या भुंड्या दिवसात,

का भावनांची पालवी सारखी मोहरतात !!

--वैशाली

सध्या काही वाटणंच बंद झालंय!!

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

नापास होऊदे वा appreaciation मिळूदे..

बस चुकुदे वा ऑफिसात लेट working kin राहूदे !

कुणी बोललं काय किंवा कुणी विसरलच काय..

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

पावसात छत्री विसरू दे अगर भर उन्हात रांगेत ताटकळूदे ..

नेमका मंदिरात प्रसाद संपुदे किंवा कुणी उगीच cadbury देऊदे..

सध्या काही वाटणंच बंद झालं!!

असंच वाटता वाटता..

नेमका त्याचा फोन येतो..

तो म्हणतो.. आता हो कि settled !

माहीत आहे मला, हे सांगताना मन भरले होते त्याचे!

मी इकडे शांतच..

त्याला माहीत होते उत्तर माझे.. तरीही उगाच त्या वेड्या शपथ !!

म्हणतो कसा, तुला सुखी बघितल्याशिवाय चैन नाही मला..

जाणून आहे तो, माझ्या सुखाची व्याख्या अजूनही तो एकच.. !

मी इकडे शांतच..

द्वंद माजले मनात माझ्या

म्हणे माहीत आहे मला, तू नाकारली खूप स्थळं..

तुला असं बघता, मला खूप त्रास होतोगं..

विसरून जा जे काही होतं ते..

मला परत हवीये तू एका मैत्रिणीसारखी..

मला सांभाळायला.. (???)

मी इकडे शांतच..

खूप विचित्र चाललंय माझ्यासवे सगळं..

कसं समजाऊ तुला..

माझ्यामुळे तुझी हीं अवस्था नाही सहन होत मला..

माझ्यासाठी.. फ़क़्त माझ्यासाठी settled हो..

मग बघ.. तुझा मी कसा परत उमलतो..

मी इकडे शांतच..

काय उत्तरणार!! एकच वाटून गेले ..

आजपर्यंत जे काही घडलं ते तुझ्याचसाठी होतं रे!

आणि सगळं काही तुझ्याचमुळे!!

आता ह्यापुढेहीं सगळं तुझ्याचसाठी अन तुझ्याचमुळे !!

भरल्या डोळ्यांनी फोन ठेवला त्याने..

ती रात्र मावळता

मी शांतच !! आठवणींचे फुले वेचीत सगळे..

--वैशाली