सध्या काही वाटणंच बंद झालं
नापास होऊदे वा
बस चुकुदे वा ऑफिसात लेट working kin राहूदे !
कुणी बोललं काय किंवा कुणी
सध्या काही वाटणंच बंद झालं
पावसात छत्री विसरू दे अगर
नेमका मंदिरात प्रसाद संपुदे
सध्या काही वाटणंच बंद झालं
असंच वाटता वाटता..
नेमका त्याचा फोन येतो..
तो म्हणतो.. आता हो कि settled !
माहीत आहे मला, हे सांगताना मन भरले होते
मी इकडे शांतच..
त्याला माहीत होते उत्तर माझे.. तरीही उगाच त्या वेड्या शपथ
म्हणतो कसा, तुला सुखी बघितल्याशिवाय चैन
जाणून आहे तो, माझ्या सुखाची व्याख्या अजू
मी इकडे शांतच..
द्वंद माजले मनात माझ्या…
म्हणे माहीत आहे मला, तू नाकारली खूप स्थळं..
तुला असं बघता, मला खूप त्रास होतोगं..
विसरून जा जे काही होतं ते.
मला परत हवीये तू एका मैत्रिणीसारखी..
मला सांभाळायला.. (???)
मी इकडे शांतच..
खूप विचित्र चाललंय ग माझ्यासवे सगळं..
कसं समजाऊ तुला..
माझ्यामुळे तुझी हीं अवस्था
माझ्यासाठी.. फ़क़्त माझ्यासाठी settled हो..
मग बघ.. तुझा मी कसा परत उमलतो..
मी इकडे शांतच..
काय उत्तरणार!! एकच वाटून गेले ..
आजपर्यंत जे काही घडलं ते तुझ्याचसाठी होतं रे!
आणि सगळं काही तुझ्याचमुळे!!
आता ह्यापुढेहीं सगळं तुझ्याचसाठी अन तुझ्याचमुळे !!
भरल्या डोळ्यांनी फोन ठेवला त्याने..
ती रात्र मावळता
मी शांतच !! आठवणींचे फुले वेचीत सगळे..
--वैशाली
No comments:
Post a Comment