आता जगणं कसं नकोसं वाटतं..
काही मजाच राहिली नाही बघ..
तुझी साथ होती,
तेव्हा सगळं कसं छान, सुंदर होतं..
कसा डोळ्यांनी छेडायचास..
तुझ्या ती मूक नजर नेहमीच
कसं बरोबर समजायचं रे तुला,
मला तुझी गरज आहे ते…
मनात आलं माझ्या की लगेच तू समोर असायचा,
माझे नखरे झेलायला..
मला कसारे कधीही राग यायचा .. (विनाकारणच असायचे ते खुपदा.. )
आणि तुला लगेच कळायचं की मी
लगेच तुझा msg .. “Let’s meet..”
तुला कळले की नाही कुणास ठाऊक..
पण मला नेमकं तेच हवं असा
मी का चिडले हे कधीही नाही विचारलेस तू..
फक़्त सांभाळलस मला..
प्रत्येक वेळी..
असे, की मी मलाच विसरले होते..
माझाच होतास तू,
फक़्त माझ्याचसाठी,
मला पुरेपूर समजणारा..
माझ्यावर पूर्ण हक़्क़ असणारा.
त्या दिवशी ..
कसे मी तुला जाऊ दिले..
काहीही न बोलता, न भांडता..
मला माझेच कळेनासे झाले
खरं तर
मला तू हवा होतास .. जन्मभर ..
भांडायचे होते मला तुझ्यासवे ..
जाब विचारायचा होता ..
की आता माझे काय..
मी तर विचारच नव्हता केला
तुझ्याशिवाय एकही क्षण घालवा
आतून पार तुटले होते मी..
सगळी समीकरणं चुकवून गेलास..
गणितात कसं एकदम उत्तर शून्यावर आणलं तू integration चं..
फरक एवढाच की मला अपेक्षित ते infinity होतं..
एक मन हेही जाणून होते की
काहीतरी कारण असेलच..
तू का वाट वेगळी केलीस..
पण तरीही पायाखालची माती अजून भुसभुशीत होत गेली..
तुझे बांधारे बघत..
मला कळलेच नाही रे..
कधी माझा किनारा वाहून गेला..
-- वैशाली
No comments:
Post a Comment