Monday, March 7, 2011

something random-0

traffic मधून वाट काढत.. असंच sidela नेलंस.. कसला boar रस्ता होता तो! मला एक क्षण कळलंच नाही, का उतरायला लावलास तू मला bike वरून!
मी विचारणार तुला.. तेवढ्यात..
कसं सहज म्हणून गेलास .. “I’m getting engaged..”

चेहऱ्यावर शून्य भाव! मी तर हादरलेच.. पायाखालची जमीनच सरकली माझ्या.. असं कसं म्हणू शकतोस?
तू.. मी.. आपण.. काही काही नाही विचार केलास? माझं तर सर्वस्वच नेलं तू! काही कळायच्या आत सगळं काही संपवून टाकलं !! खचायलाही जागा उरली नाही मला.. कसा घेतला कसा हा निर्णय तू?

त्या मागच्या मंदिरात कुणीतरी जोर-जोरात घंटा वाजवल्याचा भास झाला मला !! कुणीतरी सपकन कानाखाली चपराक काढली असं वाटलं...

म्हणे मला भेटायचंच होतं तुला!! अरे, जर मी आग्रह नसता धरला, तर तू मला कधी भेटलाच नसतास !! माझ्या इच्छा, अपेक्षा, भावना.. सगळ्यांनाच सरणावर घेऊन गेला असतास .. माझ्या मनाविरुद्ध!!

मला काय हवंय , माझा काय मत.. विचारच नसेल केलास तू! बस, सांगून मोकळा!! नंतर मी म्हणायला नको, तू उशिरा सांगितलस मला म्हणून!
असं होतं का रे? एवढी मी नगण्य!!
तुझ्या एवढ्या मोठ्या निर्णयात माझा खारीचाहि वाटा नाही ??

माझ्या आयुष्याबद्दल एवढा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा हक़्क़ मी तुला कधी देऊन टाकला हे माझं मलाच कळलं नाही!! त्याचा तू असं काही वापर करशील हे खरंच माझ्या ध्यानी नव्हतं!

traffic हळू-हळू पुढे सरकत होती.. मी अशीच तुझ्याकडे बघत.. अन तू.. माझ्याकडे बघूनही मला न बघू शकलेला !!

तुला वाटलं असेल, मी खूप चिडेल तुझ्यावर.. जाब विचारेल तुला.. रडा-रड होईल.. आणि मग.. तू काहीतरी करून समाजावूनच टाकशील मला! नाही ?
तुझ्या शब्दापुढे एकही पाऊल न टाकणारी मी!! हे पण मान्य करायला हवंच ना मी? मला दुसरा काही पर्याय ठेवला का रे तू!!


मी निर्विकार... खरं तर कळतंच नव्हतं, हे माझ्यासोबत होतं आहे का? आणि का?? मीच का?? मी कधी ऐकलं नाही तूझं? कधी विरोध केला तुला?
कि.. तुला कधी मी जमलेच नाही !! मी नकोच होते तुला? ते खरंच फ़क़्त आकर्षण होतं तूझं? कि वेळ घालवायची होती तुला..

मी बसले परत नजर फिरवून.. माझ्याच प्रश्नात गुरफटत होते मी .. उत्तर नव्हती सापडत.. फ़क़्त प्रश्नांचा जाळ विनलं जात होतं माझ्याभोवती !!
आणि सुसाट काढलीस मग तू bike ..

माझं तुला काहीही ना बोलणं.. निमुटपणे परत bike वर बसणं .. टोचला का तुला?
त्रास झाला तुला, मी काहीही सवाल ना केल्याचा?
कि खुश होता तू? एक ब्याद टाळली म्हणून !!


अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!


--वैशाली

No comments:

Post a Comment