अजूनही.. ४ वर्षानंतर.. असंच शून्यात बघत असताना.. मनात एकाच.. नेमकं काय कारण असावं तू मला सोडल्याचं?.. उत्तर मिळालं नाही मला अजून.. हो, रोज एक हमखास नवीन प्रश्न न चुकता येतो मनात !!
का सोडलं असावं तू मला !!
असो. तुला आणि मला.. दोघांनाही माहित नव्हतं कि आता पुढे काय... उगीच रस्त्यांवर चक्कर टाकणं चालू होतं..मला कळतंच नव्हतं तुला घट्ट मिठी मारू कि मागे सरकून बसू.. थोडी जास्तच भावूक मी तुझ्यासाठी.. तुला माझ्या मिठीत सामावण्याचा प्रयत्न केला.. आता माझा स्पर्शही तुला परका झाला का रे?
मनात उगीच त्या कुण्या शायर च्या ओळी आठवल्या... "रस्तेका पत्थर किस्मत ने मुझे बना दिया .. जो रास्तेसे गुजरा .. ठोकर मुझे लगा गया !!"
आपण जात होतो... मी पण नाही विचारलं कुठे.! खरं तर, तुला हि उत्तर माहिती नव्हतं.. बरोबर ना?
मला नक्की आठवत नाही आत्ता.. नेमकं infinity ला गेलो होतो कि अंधेरी स्टेशन च्या बाहेर च्या Mac D ला? सगळा काही असूनही नसल्यासारखं होतं..
एक-एक गोष्ट मला आठवायला लागली.. तू तेव्हा असं का वागलास.. तसंच का केलंस.. याचा बहुतेक प्रत्यय येऊ लागला.. मग सगळ्याच प्रश्नांचं उत्तर शेवटी "I'm getting engaged .." ला येऊन पोचलं... ती लाट अशी उसळी घेऊन परत समुद्रास मिळून गेली.. आणि मी.. कोरडीच !!
आठवलं.. infinity ला च गेलो होतो आपण.. actually , cinemax ला गेलो होतो.. movie ला वेळ होतं, म्हणून मग वेळ घालवण्यासाठी food court निवडलं आपण.. नव्हे, तूच !!
sandwitch आलं.. तू घेऊन आलास.. दोघांकडेही बोलण्यासारख काही नाही.. उगीच मला भरवू लागलास.. शेवटचंच होतं ते सगळं.. माझे सुखाचे क्षण तुझ्याने बघवतच नाही का?? पण guts म्हणावे लागतील तुझे..
विचारतोस कसा, "नाम नहीं पूछोगी ??" तू भरवलेला घास तसाच अडकला.. भोवतालच सगळं काही स्तब्ध झालं.. क्षणभर वाटलं श्वास हि थांबतोय का माझा?? तो घास मला गिळायालाही होईना... तसंच ढकलला आत!!
तू नाव सांगितलस.. तुला एक खड्कन वाजवावी असं वाटून गेलं !
ती जखम अजून ओलीच होती रे.. लगेच मीठ चोळायची घाई तुला!!
ती तीच ना.. लहानपणी कधीतरी तुला तिच्यावर प्रेम आलं होतं?? पाणी भरून आलं डोळ्यात.. अन खळकन ते गालावरून वाहून गेलं.. तुझ्यासाठी कधी ते अश्रू होते.. माझ्यासाठी नेहमीच पाणी ..
असं कितीदा प्रेम झालं तुला .. सांगशील का मला??
माझा हात हातात धरलास तू.. समजाऊ लागलास.. मी समजणार होते का? तू तरी मला पूर्णपणे समजाऊ शकला असतास का?? मी बघत होते तुलाच.. तू म्हणालास, "आप ऐसे मत देखो, please .. " काय झालं? guilt वाटत होती? कि मला परत एकदा फुसलवायचा प्रयत्न होता तुझा..
काहीही असो!
माझ्याकडे तर काही नव्हतेच उत्तरायला !! मनात येऊन गेलं.. was this the reason , you never introduced me to your parents ?? " कधी मला तुझ्या group मध्ये शामिल नाही केलंस ?
निव्वळ timepaas का मी होते?
पण तरीही, तुझ्या चेहऱ्यावरून नजर हलतच नव्हती!! तू सोबत असलास म्हणजे सगळा कसं perfect असणार.. आणि नसलं, तरी तू सगळं काही व्यवस्थित करशील..
screen अस्पष्ट दिसत होती.. कळलेच नाही मला का ते? गालावर हाथ फिरवला तेव्हा कळलं.. डोळे भरून आले होते माझे.. सगळं कसं स्पष्ट आणि लक्ख आठवतंय आजही मला..
अजूनही, तेव्हडाच भाबडा विश्वास आहे माझा तुझ्यावर!!
मनात असाच परत एकदा येऊन गेलं.. "मेरी किस्मत में तू नहीं शायद.. में तेरा इंतज़ार करती हु.. कल मेरा इंतज़ार था तुझको.. आज में इंतज़ार करती हु !!. "
--वैशाली
No comments:
Post a Comment