Tuesday, March 15, 2011

something random -3

आता खरं तर दोघांना फ़क़्त साथ हवाय, निशब्ध.. मनाशीच बोलायला.. एकमेकांना परत एकदा नव्याने समजून घ्यायला..



कळतच नव्हतं मला नेमका काय विचार करायचंय.. सगळा कसं कृष्ण-राधेप्रमाणे चाललं होतं.. मला कधीच मान्य नसलेलं !!



तू बोलला होतास कधी, "राधा-कृष्णाचं" मंदिर बनतं वेडे.. त्यांचा प्रेम कसं अमर असतं..

पण मला तर तुझ्या प्रत्येक क्षणाचा सहवास हवा होता .. अमर प्रेम वैगेरे मला नाही रे काही कळत.. आणि मला कळवूनही घ्यायचं नव्हतं!



that movie was boring .. कळत नाही लोक असले सिनेमे का काढतात ते!



आत्ता कळलं मला, माझं मनच नव्हतं लागत..



I wanted to have something, I never had in life.. I wanted to take life my way.. पण सगळं कसं उलटंच झालं !!

तू खूप पुढे निघून गेलास.. मी.. जिथून सुरु केले तिथेच परत होते.. ओंजळ पूर्णतः रिकामी करून..



माहित आहे मी काय विचार करत होते? हा, कि मी असं कसं लगेच accept केलं !! and why I'm not fighting you !!

remember , जेव्हा भांडणं व्हायची, I never used to say sorry .. you had to patch up everytime :)



आणि आज, तुझा हात हातात घ्यायला पण आता विचार करत होते मी.. घेऊ कि नको.. तुला ते आवडेल? कि तू...



तुला कळलं वाटतं ते.. नेहमीसारखं !! तूच घेतला हाथात हाथ माझा.. परत सगळं काही स्तब्ध!! beyond words ..

एकमेकांनाच ऐकत होतो आपण.. मौनातून..

आठवतंय किती किती बोलायचो आपण.. नेहमीच अपुरा पडणारा वेळ.. आज जातंच नव्हता !!



हे असं का झालं?



तू पण मला किती आणि काय काय समजावलं असतं.. मी कधी काय समजलंय !! जाणून होतास तू..

मी ऐकणार नव्हतेच.. नेहमीपासूनच, मला जे हवंय तेच मी केलंय.. तेच मिळवलंय..

आणि तू असा, सगळ्या स्वप्नांना पायदळी तुडवत चालला होता.. and for the first time in life .. मी फ़क़्त बघतच राहिले.. ऐकतच राहिले..

सगळं काही तू सांगशील तसं मान्य करत गेले..



यालाच प्रेम म्हणतात का?



एकामागून एक, त्या एका वर्षातले सगळे दिवस मला आठवले..

मी तुझ्या looks वर फिदा वैगेरे होते असलं काही नव्हतंच मूळी.. मी फिदा होते, तुझ्या स्वभावावर, the way you understand the things n the people .. तुझ्याकडे नेहमीच सगळ्या गोष्टींच solution असायचं..

that was the thing I used to love in you..



friendship day होता... I had gifted you with the card n choclate ..

आठवतंय मला, दिवसातनं ५० वेळा तू मला call करून सांगितलं होतंस, तुला किती आवडलंय ते कार्ड..

आवडायलाच हवं होतं ! मी दिलं होतं.. :) :) आपली choice म्हणजे कशी.. classy !! आणि तसाच तू !!

माझ्या choice मध्ये perfect बसणारा !



बस तिथूनच सगळं काही सुरु झालं..



आजच्या ह्या दिवसापर्यंत..



मला कळलंच नाही, कधी माझ्या गंगा-जमुना वाहू लागल्या..

तुझा हाथ जेव्हा माझ्या गालांवरच पाणी पुसत होते, that time I realised ..

खरंच तू माझा नव्हता का कधी?

असा वळणावर सोडून जायला त्या दिवशी माझ्याकडे आला होतास? कि तुला विश्वास नव्हता म्हणून, कि तुझ्यावर पण कुणी प्रेम करू शकतं !!



मला नव्हता विचार करायचा काही.. पण ते चक्र काही केल्या थांबेना..

आणि परत त्या जुन्या आठवणी नव्याने उजाळू लागल्या.. तेव्हा माहित नव्हते मला कि सगळं असा उंबर्याआतच राहणार म्हणून !!





--वैशाली

No comments:

Post a Comment