Tuesday, March 15, 2011

something random -4

आणि परत त्या जुन्या आठवणी नव्याने उजाळू लागल्या..

result होता ..

आणि तू पुन्हा एकदा drop लागायच्या फंद्यात होता.. सकाळी उठून तुला phone केला.. तर तू माझ्या अगोदरच college ला हजर !!

तेव्हा आपण acquintances कम friends होतो..

आजचा दिवस आणि तो दिवस.. जीवनाचा रंगच जणू काही बदलला होता.. आता रंगीत कुठला आणि black n white कुठला.. हे सांगणं जरा कठीणच आहे म्हटलं नाही तरी !!

तू कसा भेदरलेला होतास.. तुझा जीव असा वरती खाली होत होता..

काय होईल आणि काय नाही.. एक विषय जरी चुकून जास्त लागला तर सरळ घरी वरात.. सगळं कसा अटी-तटीच..

मला आजचा दिवस बघायचा होता ना.. मला हे भोग भोगायचेच होते..

result हातात आला..

कसा पळत जाऊन सगळ्यांपासून दूर उभा राहिलास, जिन्यापाशी.... भिंतीला डोकं टेकवून.. डोळे बंद करून..

मी हाथ हाथात घ्यायचा प्रयत्न केला तर तू फ़क़्त माझा एक बोट घट्ट पकडलं होतंस..

मी result बघितला.. तुला backlog लागले.. झालं.. you were in boss!!

मला कसलं हायसं वाटलं म्हणून सांगू !!

खरं तर जेव्हा पासून मला तुझ्यातला "तू" माहित झालास तेव्हा पासूनच मी तुझ्यावर फिदा होते.. ह्या result च्या पण एका वर्ष अगोदर पासून !!

जीवात जीव आला माझ्या.. पहिल्यांदाच तुला एवढ्या जवळून पाहत होते..

तुझ्या डोळ्यात बघत पुन्हा एकदा प्रेमात पडले तुझ्या.. :)

तेव्हाच कळलं का तुला?

तेव्हडाच तो एक मिनिट .. तुझ्या मित्रासावे निघून गेलास तू.. मला तसाच त्या पायरीवर उभा ठेऊन..

मी परत माझ्या मैत्रिणीसवे..

कॅन्टीन मध्ये भेटलो परत आपण.. after an hour or something ..

परत तुला कुठेतरी जायचं होतं.. :)

परत तू फ़क़्त माझा हाथ धरलास.. पहिल्यांदा.. डोळ्यांत बघत.. एक शिरशिरी चढली.. कायमचीच !!

दोघांना कळून चुकले.. तेव्हाच, त्या क्षणीच... कायमचेच.. कधीच बदलणारे..

--वैशाली

No comments:

Post a Comment