Tuesday, March 15, 2011

something random - Final one!

परत तू माझा फ़क़्त हाथ धरलास.. पहिल्यांदा.. डोळ्यांत बघत.. एक शिरशिरी चढली.. कायमचीच !!

दोघांना कळून चुकले.. तेव्हाच, त्या क्षणीच... कायमचेच.. कधीच न बदलणारे..



सांज आली.. रात्रीला घेऊन.. mobile वाजला.. बघते तर तुझा call .. धड धड सुरु झाली जीवात..

receive करू कि नको.. केला receive ..

असंच timepass गप्पा टप्पा..

आणि तू विचारलस.. "do you love me ?".....

चोर कसा चोरी पकडल्यावर घाबरतो.. तसच झालं नेमकं माझं.. कळतंच नव्हतं काय उत्तर देऊ..

प्रेम तर होतं.. पण.. कळतंच नव्हतं..

असल्याकाही भानगडीत पडायचंच नव्हतं कधी मला..



"आप कुछ खाओगे? "... मी भानावर आले.. interval झाला होता..

मन कसं जड झालं होतं..

तेव्हाच मी नकार भरला असता तर..



आज ४ वर्ष झालेत.. अजूनही तो पहिला पाउस.. पूर्ण हौसेने माझ्या पायरीशी उतरतो.. आजही ती संध्याकाळ तुझीच आस घेऊन माझ्या दारी येते..

आज पुन्हा त्याच त्याच जुन्या आठवणी.. नव्याने अंग मोडून पडल्या..

विषण्णतेणे बघत माझ्याकडे, पुनः निर्विकार जाहल्या !!

असंच वाटता वाटता..

नेमका तुझा फोन येतो..

तू म्हणतो.. आता हो कि settled !

माहीत आहे मला, हे सांगताना मन भरले होते त्याचे!

मी इकडे शांतच..

त्याला माहीत होते उत्तर माझे.. तरीही उगाच त्या वेड्या शपथा !!



म्हणतो कसा, तुला सुखी बघितल्याशिवाय चैन नाही मला..

जाणून आहे तो, माझ्या सुखाची व्याख्या अजूनही तो एकच.. !

मी इकडे शांतच..

द्वंद माजले मनात माझ्या…

म्हणे माहीत आहे मला, तू नाकारली खूप स्थळं..

तुला असं बघता, मला खूप त्रास होतोगं..



विसरून जा जे काही होतं ते..

मला परत हवीये तू एका मैत्रिणीसारखी..

मला सांभाळायला.. (???)



मी इकडे शांतच..

खूप विचित्र चाललंय ग माझ्यासवे सगळं..

कसं समजाऊ तुला..



माझ्यामुळे तुझी हीं अवस्था नाही सहन होत मला..

माझ्यासाठी.. फ़क़्त माझ्यासाठी settled हो..

मग बघ.. तुझा मी कसा परत उमलतो..



मी इकडे शांतच..

काय उत्तरणार!! एकच वाटून गेले ..

आजपर्यंत जे काही घडलं ते तुझ्याचसाठी होतं रे!

आणि सगळं काही तुझ्याचमुळे!!

आता ह्यापुढेहीं सगळं तुझ्याचसाठी अन तुझ्याचमुळे !!

भरल्या डोळ्यांनी फोन ठेवला त्याने..

ती रात्र मावळता

मी शांतच !! आठवणींचे फुले वेचीत सगळे..



--वैशाली

No comments:

Post a Comment