Monday, August 23, 2010

मुझे न पता था !!

राहें मंजिल हमारे साथ अब तुझे गंवारा होगा!

मुझे पता था, तू ख़फ़ा इस कदर होगा..


तेरी आंखोमे में तवज्जु अपन आप से हुवा था!

मुझे पता था, पलके झपकते इस कदर बिखरजयेगा ..


वो झुकी सी नजर, पुकारा करती थी मुझे!

मुझे पता था, इकरार--मुहोब्बत बेवजह होगा..


थामा था हाथ तुने सदियों के लिए!

मुझे पता था, सदियों का सफ़र कुछ पल का होगा..


ठेहराव आया था ज़िन्दगी में, शिरकत से तुम्हारी!

मुझे पता था, सारी रात मुलाकात तुफानो से होगी


प्यार आसुओंसे करना सिखाया था तुने,

मुझे पता था, चारों मौसम आसू ही हमदर्द रहेंगे मेरे!!


वो हंसी की लड़ियाँ लुभाया करती थी तुझे,

मुझे पता था, इस चेहरे में कोई और भी नजर आता है तुझे..


बड़ी आसानीसे फर्मादिये, के नशा-- मुहोब्बत तुम्हारा रहा अब..

मुझे पता था, नशा मेरी जान को रोज़ नया लगत है अब !


--वैशाली

मी एकटीच.. !

मानिले कधी त्यांनी मला आपुले,

फरफटल्या वेशीवर मी एकटीच सले..


त्यांना नको होते काटे गुलाबासवे,

थरथरल्या ओठांसह मी एकटीच बसले..


भोगताना दुखः मी, सुख काय ते विसरले..

वेदना बधीर होता मी एकटीच बसले..


रक्ताने देवळाचे आंगण लाल ाले..

अधिकउणे मापत मी एकटीच बसले..

बसल्या जागीच पाश ते आवळले,

स्तब्ध हुंकार देत मी एकटीच बसले..


कातरवेळ ती नटून समोर येते..

पुसलेल्या कुंकवासह मी एकटीच बसले..


सांत्वनास सारा गाव लोटला होता..

अश्रू गळीत मात्र मी एकटीच बसले..


--वैशाली

अतृप्त..

मांडीला तू खेळ ऐसा, मी माझी राहिले..

मिलनाच्या ओढीने , अतृप्त मी राहिले!!


जुडा सुटता, मोगऱ्याचा घरभर सडा ..

भान हरपले तरीही, अतृप्त मी राहिले!!


बोटांत गुरफटताना, तडे हालचालींना गेले..

खासगी रात्रीत त्या, अतृप्त मी राहिले!!


काजळ पसरले, पुसले कुंकू जरासे ...

विशाल जाळ्याप्रमाणे, अजून तृप्त मी राहिले!!


उलटता रात्र, आस देहाला, अजून एका भेटीची..

मदीर गंध मिठीत तरीही, अतृप्त मी राहिले!!


अवतरता पहाट राहिला, शृंगार माझा अधुरा ..

मनाला कुरवाळू लागता, अतृप्त मी राहिले!!


उभा व्हरांड्यात तू , सुखावल्या नजरेने पहात होता..

तृप्त तू झालास पण, अतृप्त मी राहिले!!


--वैशाली

Monday, August 16, 2010

तो..!! (16-08-10)

सा-या गोंधळाचे तुकडे जुळवणार होता..

मला अर्थ ओघळायचा समजवणार होता..

दवासंग वाहणं सोडून,

त्या पातळ अंधारात वारा निथळत होता!!


अंधारात प्रेमाचे हर एक पान उलगडणार होता,

मला महती समर्पणाची वदनार होता..

असंख्य प्रहार एका रात्रीत,

तो चंद्र आज चांदण्यांशी सलगीच करत नव्हता!!


पावसात चिंब भिजवणार होता,

मला प्रेमाची उत्कटता दाखवणार ोता..

मिठीत भरणं सोडून,

तो चित्र माझे दुरूनच रेखाटत होता!!


पाणी अन आसवांचा फरक सांगणार होता..

मला प्रेमातील दुःखाचे कारण पुसणार होता..

माझ्या आसवांना पाणी कथुन,

तो अंत माझ्या प्रेमाचा पाहत होता!!


म्हणे प्रेम नाही तुझ्यावर,

पण आवडतेस तू मला..

अंत्ययात्रेत मात्र माझ्या,

सगळ्यांच्या पुढे तो होता!!

--वैशाली

Friday, August 6, 2010

अर्धे गीत.

कळले मला का मी फ़क़्त 'प्रेयसी' तुझी..
का
पुनव सोडून चंद्राला असूया अवसेची..
का
विझतो सूर्य संध्याकाळी,
अन
का रात्री नंतर पहाटेला असते घाई..

जाऊन पाशात अवसेच्या,
फुलायचे
होते कणाकणातून चंद्राला..
पारावर
विसावलेल्या चांदण्यांना,
दवातून
न्हावायचे होते पहाटेला..

नजरेत तुझ्या मी भरले होते..
पण
सगळेच संकेत शुभ्र नव्हते..
तुला
वेध होते ओघळायचे..
अन
मज वेडीला समर्पणाचे..

तुझ्यासोबत प्रीतीचा,
राग
मल्हार छेडायचा होता..
बरं
झालं तू निघून गेलास..
खरं
तर अर्ध्या गीतातच अर्थ होता !!

--वैशाली

स्मरता तुला

मन वाऱ्यागत भरकटते,
ओढ
ओठांची अनावर होते..
स्मरता
तुला,
सांज
ही अशी नटून बसते!!

देवळाच्या पायरीशीच पाऊल थबकते,
वाट
का ही संपली वाटते..
स्मरता
तुला,
माझी
मीच मला विसरते!!


मोती
गवसतात मातीतून,
शिंपले
वाट चूकतात समुद्रातू..
स्मरता
तुला,
प्राजक्त
बहरतो रात्रीतून!!


कैफ तुझा असह्य होतो,
समेलाच
हा ताल चुकतो..
स्मरता
तुला,
स्पर्श
माझाच बावरा होतो!!


चंद्र
उगवतो चांदण्याविना,
पारिजात
केशरी रंगाविना..
स्मरता
तुला,
मग
मी ही बहरते माझ्याविना!!


-- वैशाली

गीत आयुष्याचे

आरोही वसला तू माझ्या, अवरोह श्वासात विरले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

मिलनाच्या त्या वाटेवर, काट्यांनी गुलाबास घेरले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

ग्रहणाच्या त्या चक्रातून, राशींना सुटता आले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

सूर माझे हुंदक्यांचे, मुकेच भैरवी गायले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

ग्रहणरात्री चंद्राला, चांदण्यांनी एकटेच सोडले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

छेडतांना तार तंबोर-याची, पंचमास मी विसरले..
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!

प्रीतीला आपुल्या, रंग मैत्रीचे तू चढवले!!
गीत
आयुष्याचे, असे अधुरे राहिले ....

सोडलेस असे तू एकटे, मीच मजला वीसरले..
जगणेच मग माझे , असे अधुरे राहीले .. (added by अमोल..)

-- वैशाली

.