मानिले न कधी त्यांनी मला आपुले,
फरफटल्या वेशीवर मी एकटीच ब
त्यांना नको होते काटे गुलाबासवे,
थरथरल्या ओठांसह मी एकटीच बसले..
भोगताना दुखः मी, सुख काय ते विसरले..
वेदना बधीर होता मी एकटीच बसले..
रक्ताने देवळाचे आंगण लाल झ
अधिकउणे मापत मी एकटीच बसले
बसल्या जागीच पाश ते आवळले,
स्तब्ध हुंकार देत मी एकटीच बसले..
कातरवेळ ती नटून समोर येते.
पुसलेल्या कुंकवासह मी एकटीच बसले..
सांत्वनास सारा गाव लोटला होता..
अश्रू गळीत मात्र मी एकटीच बसले..
--वैशाली
No comments:
Post a Comment