Friday, August 6, 2010

अर्धे गीत.

कळले मला का मी फ़क़्त 'प्रेयसी' तुझी..
का
पुनव सोडून चंद्राला असूया अवसेची..
का
विझतो सूर्य संध्याकाळी,
अन
का रात्री नंतर पहाटेला असते घाई..

जाऊन पाशात अवसेच्या,
फुलायचे
होते कणाकणातून चंद्राला..
पारावर
विसावलेल्या चांदण्यांना,
दवातून
न्हावायचे होते पहाटेला..

नजरेत तुझ्या मी भरले होते..
पण
सगळेच संकेत शुभ्र नव्हते..
तुला
वेध होते ओघळायचे..
अन
मज वेडीला समर्पणाचे..

तुझ्यासोबत प्रीतीचा,
राग
मल्हार छेडायचा होता..
बरं
झालं तू निघून गेलास..
खरं
तर अर्ध्या गीतातच अर्थ होता !!

--वैशाली

No comments:

Post a Comment