मन वाऱ्यागत भरकटते,
ओढ ओठांची अनावर होते..
स्मरता तुला,
सांज ही अशी नटून बसते!!
देवळाच्या पायरीशीच पाऊल थबक
वाट का ही संपली वाटते..
स्मरता तुला,
माझी मीच मला विसरते!!
मोती गवसतात मातीतून,
शिंपले वाट चूकतात समुद्रातू
स्मरता तुला,
प्राजक्त बहरतो रात्रीतून!!
कैफ तुझा असह्य होतो,
समेलाच हा ताल चुकतो..
स्मरता तुला,
स्पर्श माझाच बावरा होतो!!
चंद्र उगवतो चांदण्याविना,
पारिजात केशरी रंगाविना..
स्मरता तुला,
मग मी ही बहरते माझ्याविना!!
-- वैशाली
No comments:
Post a Comment