आरोही वसला तू माझ्या, अवरोह श्वासात विरले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
मिलनाच्या त्या वाटेवर, काट्यांनी गुलाबास घेरले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
ग्रहणाच्या त्या चक्रातून, राशींना न सुटता आले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
सूर माझे हुंदक्यांचे, मुकेच भैरवी गायले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
ग्रहणरात्री चंद्राला, चांदण्यांनी एकटेच सोडले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
छेडतांना तार तंबोर-याची, पंचमास मी विसरले..
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले !!
प्रीतीला आपुल्या, रंग मैत्रीचे तू चढवले!!
गीत आयुष्याचे, असे अधुरे राहिले ....
सोडलेस असे तू एकटे, मीच मजला वीसरले..
जगणेच मग माझे , असे अधुरे राहीले .. (added by अमोल..)
-- वैशाली
.
No comments:
Post a Comment