Thursday, May 27, 2010

few here n there..


१.
मना थांबना, जरा थांबना..
फुंकर हवी जरा ह्या वेदनांना..
अंतरी फाटल्या ह्या जखमा..
न कळे तुझे धावणे ओलांडून त्यांना..


२.
हुरहूर का लागली ही मना..
तुझ्या सोडण्याचा एवढा का गवगवा..
असे काय नवखे केले तू सवे माझ्या?
कि अस्तित्व माझे हे संपल्यातच जमा !!


३.
किती असावे माझे मागणे..
माझे मला न कधी उमजले..
कळले तेव्हा वेळ गेली..
होते ते देऊन, काळोखास त्या स्वाधीन तू झाली ..


४.
उमलणं केविलवाणं करत तू निघून गेलास..
त्या एकाकी फुलाला आता ओळखच पटेना फुलपाखरांची !!


५.
विचलता का थांबली मनाची,
अश्रू डोळ्यातच विसावले असे..
निरागसतेने मी बदलली कुशी..
गारव्या सह रात्र रंग माझा घेऊन गेली..


६.
पुन्हा तीच वेडी पहाट..
एक धुंद रात्र संपवून..
परतायचं आता मला..
अन ह्या परतीच्या वाटेवर गाव फ़क़्त दुःखाचे आहे !

७.
माणसांच्या ह्या जत्रेत
करपलायं स्पर्श फुलांचा आता..
तमाम दुखः पदरात घेऊन..
छेडायचायं मारवा आता..

८.
राशीतून ग्रह निसटतात कधी..
चंदेरी रात्रीतून ह्या चंद्र कधी..
हुंद्क्यातून स्वर मुके..
तर जाणवतात स्वरांतून हुंदके कधी..

९.
काहूर माजले का मनात..
हा दिवा का मिनमिणतो अंधारात..
बाहेर पसरले धुके पुनवेचे..
तू घेऊन आलास सोबत अवसाची रात !!

०.
हे पांढरं कुंकू विरणारं पावसात..
प्राजक्ताला नकोय आता चांदण्यांची साथ..
चूक कुणाची भोवतेय कुणाला..
अंतरा क्षितिजावर अन स्थायी विसावते नभात !!


.
सुगंध घाटावर दरवळला होता..
पुनमेचा चंद्र तुझ्याच साठी थांबला होता!
चांदणे ही धन्य झाले आज बरसून तुझ्यावर..
तो जाईचा सर.. कधीच विस्कटला होता !!

१२.
क्षण भग्न होतात नकळता..
पाण्यावर तरंगत कुंकू विहिरीच्या..
हिरमुसला तो पारिजात ओंजळीतच माझ्या,
अणि तू दूर तिथे भेटीला चंद्राच्या..


१३.
मुक्या होऊन जातात रात्री..
उरतो पारीजाताचा रंग एक केशरी..
बाहेर गुणगुणतो पाउस असा..
ओघळते मोती पहाटेच्या पदरी !! (... this line is added by अमोल )




--वैशाली

No comments:

Post a Comment