नातं तुझं आणि माझं आहे जगावेगळं..
ओढ लाऊनि जीवाला व्याकूळ करणारं !..
कसा तू नैनांनी स्पर्शतोस मला..
लाजून लपायला होतं तुझ्या कुशीत मला..
पिसे लाविते माझ्या मनाला
तुझं ते चिंब भिजवणं मला प्रेमात तुझ्या..
ते तुझं मला जवळ घेणं ..
न सांगता बाहूत सामावून घेणं ..
अन उघड्या ओठांना माझ्या तृप्त करणं..
एक तुझ्यातच गुरफटायला आतुरली असते मी ..
मी काय आणि हा देह काय.. तुझ्यावाचून करमेना कुणाला..
अन सांज हि येते लवकर एक माझ्याचसाठी आजकाल ..
--वैशाली
No comments:
Post a Comment