सांज ही रुसली होती..
आता पहाटही न पुसे मला..
तुझाच गंध ओढून,
स्वप्नात मोहमयी रात्र आता जाते..
असाच असतोस तू मदमस्त..
अन अशी मी तुझ्याचसाठी श्रुन्गारलेली..
नकळत गुंफले जातात हात हातात,
अन खेळ सुरु होतो..
तुझा जिंकण्याचा.. अन माझा..
तुला जिंकवायचा..
तयार झाले होते मी अजून एकदा..
कळे न मला,
का तुझा एक स्पर्श हा बहर जसा मोगऱ्याचा..
वाहत गेला देह माझा तुझ्या त्या धुंदीत..
जाग आली तर सडा मोगऱ्याचा हा घरभर..
--वैशाली
No comments:
Post a Comment