मागचे आठ दिवस झाले..
तुझी आठवण ही अशी भिंतीवर टांगलेल्या फोटोसारखी...
गेलीच नजर तर बघायचं,
नाहीतर मन जाणून असतं की फोटो आहे त्या कुण्या एका भिंतीवर !!
आज अचानक सगळंच कसं बिनसायला सुरुवात झालिये..
एका मागुन एक.. काहीच नीट घडत नाहीये आज!!
आणि तू सोबत नसल्याचे सत्य, असं खुपायला लागलंय..
मग, तुझी आठवण करणं हे आलंच !!
अन त्या भरात कविता करणं, हा ही सध्या नादच झालाय तसा माझा..
कसे तुझे ते डोळे, अजुनही 'मी फक्त तुझाच!!' हे बोलतात..
कसे माझे हे जीवन तुझ्याविना अगदीच निरर्थक..
ह्याची स्वतःला जाणीव करवण .. हे ही त्यात आपसुकच येतं..
दिवस लोटतात ..
चार-पाच कविता पानावर उमटवून होतात..
लोकांकडून दाद ही मिळवून होते..
मग हळू हळू परत एक एक घटना नीट घडू बघते..
कवितेचं प्रमाणही ओझरतं..
आणि परत त्या कुण्या एका वळसाला थांबलेल्या रुटीनला सुरवात होते..
परत दुसऱ्या एका वळसाला थांबायचय, ह्या एकमेव ध्येयाने जणू कही..
--वैशाली

good one !! :)
ReplyDeletelast two lines are really very nice & true....
Regards,
Pallavi Wable(Pallavi_Wable@mindtree.com)
Mindtree