Thursday, May 27, 2010

झळ

अचानक हे मन द्विधा का झाले ?

जशी एक वेदना ही , हर एक नजर आता

एका क्षणाला सगळच गैर भासतं ..

अन दुसऱ्या क्षणाला सगळं आपहून माझं होतं ..

नको हे कुंपण अन वेशी ह्या ..

सगळंच असं वाटतं तुडवावं पायाखाली ह्या ..

माझ्याच विचारांच्या वेदनांनी ग्रासलंय मला आता ..

माझे मलाच कळले नाही , झाले असमर्थ मी इतकी केव्हा ..

एक तुझ्या नसण्याने एवढं अंतर पडेल हे नव्हतं जाणलं मी कधी ..

एक तुझ्या नसण्याने, अशी एकटीच पडले मी आता ..

ह्या मनाची लक्तरे होताय अशी... प्रत्येक क्षणाला,

दुरूनच जग बघतंय मला झळ लागताना !!

--वैशाली


No comments:

Post a Comment