आज रास मांडाय्चीये राधेला, ताण देणारा कृष्णच हरवलाय पण..
त्याच्या तानेवर आता कोणी औरच रास मांडलीये..
आणि इथे राधेवर मीरा व्हायची वेळ आलीये ..
बनली ती मीरा पण रास अजूनही मांडाय्चीये तिला..
मीराच आयुष्य अपनाहूनही कृष्ण हा मिळणार नाही..
हे समजवाव कुणी तिला?..
आता मीरा बनून दरस ला पण तरस्लीये कृष्णाच्या ती ..
अंतर काय हे दोघांच्या प्रेमात??
हिने हार न मानिली अन तिने जीत..
पण दोष हा काय राधेचा यात?
तिने तर प्रेम केलं होतं जीवापाड..
ह्या हारजीत मध्ये बघावं तर कृष्णच हरला खरा ..
त्या कर्तव्यापायी…
प्रेम आणि भक्ती, कुणालाही न्याय नाही देऊ शकला ..
तरी सजा हि मिळणार ह्या राधेलाच..
हिने केलं ते प्रेम अन् त्याने निभावलं ते कर्तव्य!!
--वैशाली
No comments:
Post a Comment