Thursday, May 27, 2010

निखारे

पेटलेल्या मनाचे निखारे मी विझवत होते,

आता जळण्याची क्षमताच उरली नाही..

साऱ्या वेदनांचे अश्रू गोठून गेले होते..

आता वाहायला गंगाच राहिली नाही..

हा पाउस आला कि सोबत याद तुझी हि घेऊन येतो तेवढ्याच जोमाने..

अन् आठवतं ते कट्यावर चहा घेणं पावसात चिंब भिजल्यावर आपलं...

बरं झालं तू आलास आयुष्यात माझ्या..

जीवापाड प्रेम कसं असतं हे अनुभवलं मी त्या पावसात..

आग क्षमवनं येतं बरोबर तुला..

पण हा विरह नव्हता रे अपनावयाचा मला..

बाहेर धोधो बरसतोय पाउस हा ह्या नोव्हेंबर च्या महिन्यात..

आणि आत इथे मन माझं..

तुला तरी कसा सहन होतोय विरह हा हे समजे ना मला ..

कि निखारे विझवण्याची सवयच करून घेतलीये तू स्वतःला!


--वैशाली

No comments:

Post a Comment