मांडीला तू खेळ ऐसा, मी न माझी राहिले..
मिलनाच्या ओढीने , अतृप्त मी राहिले!!
जुडा सुटता, मोगऱ्याचा घरभर सडा ..
भान हरपले तरीही, अतृप्त मी राहिले!!
बोटांत गुरफटताना, तडे हालचालींना गेले..
खासगी रात्रीत त्या, अतृप्त मी राहिले!!
काजळ पसरले, पुसले कुंकू जरासे ...
विशाल जाळ्याप्रमाणे, अजून अ
उलटता रात्र, आस देहाला, अजून एका भेटीची..
मदीर गंध मिठीत तरीही, अतृप्त मी राहिले!!
अवतरता पहाट राहिला, शृंगार माझा अधुरा ..
मनाला कुरवाळू लागता, अतृप्त मी राहिले!!
उभा व्हरांड्यात तू , सुखावल्या नजरेने पहात होता..
तृप्त तू झालास पण, अतृप्त मी राहिले!!
--वैशाली
No comments:
Post a Comment