Thursday, May 27, 2010

few here n there..


१.
मना थांबना, जरा थांबना..
फुंकर हवी जरा ह्या वेदनांना..
अंतरी फाटल्या ह्या जखमा..
न कळे तुझे धावणे ओलांडून त्यांना..


२.
हुरहूर का लागली ही मना..
तुझ्या सोडण्याचा एवढा का गवगवा..
असे काय नवखे केले तू सवे माझ्या?
कि अस्तित्व माझे हे संपल्यातच जमा !!


३.
किती असावे माझे मागणे..
माझे मला न कधी उमजले..
कळले तेव्हा वेळ गेली..
होते ते देऊन, काळोखास त्या स्वाधीन तू झाली ..


४.
उमलणं केविलवाणं करत तू निघून गेलास..
त्या एकाकी फुलाला आता ओळखच पटेना फुलपाखरांची !!


५.
विचलता का थांबली मनाची,
अश्रू डोळ्यातच विसावले असे..
निरागसतेने मी बदलली कुशी..
गारव्या सह रात्र रंग माझा घेऊन गेली..


६.
पुन्हा तीच वेडी पहाट..
एक धुंद रात्र संपवून..
परतायचं आता मला..
अन ह्या परतीच्या वाटेवर गाव फ़क़्त दुःखाचे आहे !

७.
माणसांच्या ह्या जत्रेत
करपलायं स्पर्श फुलांचा आता..
तमाम दुखः पदरात घेऊन..
छेडायचायं मारवा आता..

८.
राशीतून ग्रह निसटतात कधी..
चंदेरी रात्रीतून ह्या चंद्र कधी..
हुंद्क्यातून स्वर मुके..
तर जाणवतात स्वरांतून हुंदके कधी..

९.
काहूर माजले का मनात..
हा दिवा का मिनमिणतो अंधारात..
बाहेर पसरले धुके पुनवेचे..
तू घेऊन आलास सोबत अवसाची रात !!

०.
हे पांढरं कुंकू विरणारं पावसात..
प्राजक्ताला नकोय आता चांदण्यांची साथ..
चूक कुणाची भोवतेय कुणाला..
अंतरा क्षितिजावर अन स्थायी विसावते नभात !!


.
सुगंध घाटावर दरवळला होता..
पुनमेचा चंद्र तुझ्याच साठी थांबला होता!
चांदणे ही धन्य झाले आज बरसून तुझ्यावर..
तो जाईचा सर.. कधीच विस्कटला होता !!

१२.
क्षण भग्न होतात नकळता..
पाण्यावर तरंगत कुंकू विहिरीच्या..
हिरमुसला तो पारिजात ओंजळीतच माझ्या,
अणि तू दूर तिथे भेटीला चंद्राच्या..


१३.
मुक्या होऊन जातात रात्री..
उरतो पारीजाताचा रंग एक केशरी..
बाहेर गुणगुणतो पाउस असा..
ओघळते मोती पहाटेच्या पदरी !! (... this line is added by अमोल )




--वैशाली

तुझं नसणं..

वाट ही सामोरी.. अन एकटीच मी अशी!
एक तुझाच होता सहारा मला, आता सुन्न हे भोवताल सारे..

कधी वाटावे उपवन हे, आता फ़क़्त काटेरी रस्ते..
तुझ्या एक नसण्याने , अनोळखी हे जग सारे..

कुण्या दुसऱ्याने दिली साथ.. पण त्राण हे आता संपल्यात जमा..
तो दुसराही आता काहीसा वाटतो सारखा तुझ्या..

वाटलं होतं दुसऱ्यात गुंतवून स्वतःला, विसरेन मी तुला..
पण पुढे काय आणि मागे काय.. सगळीकडे तुझ्याच आठवणींचा सडा..

छान खेळ खेळलास तू, शर्तीवर
डाव माझ्यावर देऊन, असा लपलास न सापडण्याच्या
शर्तीवर !

रोज मी याद राखावे कि विसरायचे आहे तुला..
तूच ज्यादा याद राखितो हे, रोज नव्याने वाळीत टाकून मला !!


--वैशाली

रुटीन

सगळं कसं व्यवस्थित रुटीन चाललं होतं,
मागचे आठ दिवस झाले..
तुझी आठवण ही अशी भिंतीवर टांगलेल्या फोटोसारखी...
गेलीच नजर तर बघायचं,
नाहीतर मन जाणून असतं की फोटो आहे त्या कुण्या एका भिंतीवर !!

आज अचानक सगळंच कसं बिनसायला सुरुवात झालिये..
एका मागुन एक.. काहीच नीट घडत नाहीये आज!!
आणि तू सोबत नसल्याचे सत्य, असं खुपायला लागलंय..
मग, तुझी आठवण करणं हे आलंच !!
अन त्या भरात कविता करणं, हा ही सध्या नादच झालाय तसा माझा..

कसे तुझे ते डोळे, अजुनही 'मी फक्त तुझाच!!' हे बोलतात..
कसे माझे हे जीवन तुझ्याविना अगदीच निरर्थक..
ह्याची स्वतःला जाणीव करवण .. हे ही त्यात आपसुकच येतं..


दिवस लोटतात ..
चार-पाच कविता पानावर उमटवून होतात..
लोकांकडून दाद ही मिळवून होते..
मग हळू हळू परत एक एक घटना नीट घडू बघते..
कवितेचं प्रमाणही ओझरतं..

आणि परत त्या कुण्या एका
वळसाला थांबलेल्या रुटीनला सुरवात होते..
परत दुसऱ्या एका
वळसाला थांबायचय, ह्या एकमेव ध्येयाने जणू कही..

--वैशाली



उणीव.. 022210

रात्र ही छळते मला..
फ़क़्त हाथ फिरवते बिछान्यावर मी आता..

हर श्वासागणिक नाव तुझे..

अश्रू माझे भिजवतात उशी आता..

तू येशील हीच एक आशा..

कधी कधी श्वासही थांबतो
चाहुलीने वाऱ्याच्या आता..

सगळाच कसं निरर्थक भासवते उणीव तुझी..

ही चांदणी रात्र, अन ते सजणे माझे..
तुझी वाट पाहणारे डोळे,
अन तुझ्यासाठी आतुरलेला देह..

त्या ओठांवरच्या जखमा, तुझीच याद घेउन येतात,

अन हे व्रण देहावरचे....

तू दिलेल्या ह्या खुणांना आठवत रात्र सारी निघून जाते..

उशी पार भिजलेली..
अन मी.. तशीच...
त्या बिछान्यावर शोधत तुला..
निपचित पडलेली...

--वैशाली

धुंद.. 032710

सांज ही रुसली होती..
आता पहाटही न पुसे मला..
तुझाच गंध ओढून,
स्वप्नात मोहमयी रात्र आता जाते..

असाच असतोस तू मदमस्त..

अन अशी मी तुझ्याचसाठी श्रुन्गारलेली..
नकळत गुंफले जातात हात हातात,
अन खेळ सुरु होतो..
तुझा जिंकण्याचा.. अन माझा..
तुला जिंकवायचा..

तयार झाले
होते मी अजून एकदा..
कळे न मला,
का तुझा एक स्पर्श हा बहर जसा मोगऱ्याचा..
वाहत गेला देह माझा तुझ्या त्या धुंदीत..
जाग आली तर सडा मोगऱ्याचा हा घरभर..

--वैशाली

तू.. - 110609

दुःखाची इतकी सवय झाली की,

सुखाची भीती वाटते..

सुखापेक्षा दुखच आपलं, याचीच जास्त शास्वती वाटते..

का तू बनून आलास दुखच कारण माझ्या?

तुला नाही कळत.. पण खूप त्रास होतोय मला..

उमजत नाहीये मला की नक्की तूच माझ्या दुःखाच कारण आहे का..

तुला याद करून मन सैरभैर होतं .. हे पण एक दुःखाच प्रतिकच आहे ना !

तू फ़क़्त दुरून बघतोयेस ..

नेमकं ही आग का रंग पिवळा हेच कोड सोड्व्तोय अजून ..

हे कोड तुझं कधी सुटेल का?

आणि सुटत नाही तोपर्यंत दुरूनच बघणार ?

तू असणार तिथे दूर हि आग बघत.. पण झळ तर मलाच लागणार ना !!


--वैशाली

लम्हे - 111809

आजाओ अब लौटके ..

के जिया जाये बिन तुम्हारे ..

बहोत आजमालिया प्यार को हमन,

अब लौटादों हमें वो लम्हे हमारे ..

याद आता है तुम्हारा सेहलाना मुझे ..

वो चुपकेसे यु पास आना मेरे..

अब जब तुम दूर हो तो समझ रहा है

के क्यों मेरी हर आरज़ू पूरी हुवा रती थी तब..

और क्यों इस दिल को हमेशा ख्वाहिश रहती है तुम्हारी..

बड़ी खूबी से तुमने अपनाया तब मुझे

पता भी चला के प्यार हुवा है मुझे ..

पता है मुझे तुम भी ख्वाहिश लिए हुवे हो मेरी ..

बस इंतज़ार है तुम्हे मेरे एक आगाज का ..

कैसे समझाऊ तुम्हे के इस तरह आजमाते नहीं प्यार को ..

बस इन लम्हों में भुलाया करते है खुदको..

--वैशाली

मृगजळ 120709

का सगळं सुटत चाललंय एक एक , जशी रेत ह्या हातातून ..

उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं ्वप्न ठरलाय मृगजळ आज ..

ती सोनेरी क्षितीज नाही माझ्या साठी ..

असंच धरपडाव लागणार एक एक कवला साठी ..

तरी ते मिळेलच याची नाही शास्वती !!

कसं सगळं भासत होत एका हाताच्या अंतरावर ..

वाटलं होत , डोळे मिटले कि सगळं होणार आपलं ..

त्या एका क्षणातच मी गमावलं सगळं !

आता तर ते मृगजळ हि माझं नव्हतं राहिलं !!

वाटतंय आता , चूक हि माझीच होती !

उगीच छेडला त्या मृगजळाला मी ..

दुरून का होईना ,

स्वप्न तर दाखवायचा तो मला सोनेरी आयुष्य चे माझे !!


--वैशाली

उगीचच 131109

असं रितं रितं झालंय मन आज..

कळत नाही कुणाची नजर लागली..

सगळं कसं नीट पार पडत होतं..

अचानक हि गळती धार का लागली??

पडले होते घराबाहेर मनात तुझे अगणित विचार घेऊन..

तुला भेटायचं, नंतर ऑफिस ला जायचं..

आज बहुदा दिवस छान जाईल असं उगीचच वाटलं..

नव्हती कल्पना कि दिवसाची अशी भयाण रात्र होईल..

अन् तुला भेटणं काय पण बघायचं सुद्धा भागी माझ्या नाही..

खरच किती काल्पनिक असतं सगळं..

हे समजलं मला त्या आक्रोशावरून..

कुठं रक्ताचा सडा तर कुठे आसवांचा..

आणि मी एकटीच

मनात अगणित विचार तसेच..

फक़्त त्यांना आता दिशा उरली नाही एवढीच!!


--वैशाली